या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये.
छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की.
२८ च्या वर आवृत्या निघाल्यात.
कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे.
त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे.
विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच.
स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच.
साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत.
भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी.
मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही.
हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे.
बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा